कणकवली : एसटीत सामान घेण्यावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर एसटी वाहकाने प्रवाशाच्या थोबाडीत हाणले.कणकवली डीगवळ एसटीत हा प्रकार घडला.प्रवाशाच्या संतप्त नातेवाईकांनी एसटी डेपो मॅनेजर निलेश लाड यांची भेट घेत वाहकावर कारवाईची मागणी केली. कणकवली हुन डिगवळेला जाणाऱ्या एसटीत रमेश नन्नवरे याने सोबतचे सामान टपावर टाकण्याऐवजी एसटीत घेण्याची विनंती केली.यावरून वाहक एस पी चव्हाण व रमेश यांच्यात वाद होऊन वाहक चव्हाण याने रमेश याच्या थोबाडीत मारल्याची घटना कणकवली बस स्थानकात घडली.स्वाभिमान विद्यार्थी संघटनेचे विजय इंगळे यांनी डेपो मॅनेजर निलेश लाड यांची भेट घेत वाहक चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी जित भिसे, भीमराव इंगळे, वैभव इंगळे, दत्तू कांबळे, सौरभ इंगळे आदी उपस्थित होते.