मालवण : पोईप येथील माळरानावर लागलेल्या आगीत वरची पालववाडी, भटवाडी, जाधववाडी, माधववाडी येथील शेतकऱयांच्या बागेतील १ हजार ५०० काजू कलमे, ४५० आंबा कलमे व ५० माड जळून खाक झाले. आग रविवारी दुपारी एकच्या सुमारास लागली. आग वडाचापाट माळरानावरील सोसाटय़ाच्या वाऱयाने पोईप वरची पालववाडी येथील माळरानावर पसरल्याने शेतकऱयांच्या बागायतींचे ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. आगीत मुरारी पालव, रामचंद्र पालव, दत्ताराम पालव, प्रकाश पालव, रमेश पालव, नामदेव पालव, मधुकर पालव, शंकर पालव, नरेश पालव, मनोहर पालव, दीपक पालव, धर्माजी पालव, भास्कर पालव, विष्णू पालव, विश्वनाथ पालव, सचिन पालव, द्वारकानाथ पालव, प्रभाकर पालव, किशोर पालव, नीळकंठ पालव, सुहास पालव, भानाजी पालव, गोपीनाथ पालव, कमलाकर माधव या शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचा पंचनामा सरपंच गिरीजा पालव, उपसरपंच संदीप सावंत, ग्रामसेवक ए. बी. गर्कळ, दत्ताराम पालव, महेश पालव, सुहास वारंग, भास्कर पालव, राज पालव, अनिल पालव यांच्या उपस्थितीत झाला. त्यामुळे ऐन हंगामात काजू व आंबा कलमांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन महिन्यात मालवण तालुक्यात लागलेल्या आगीत विशेषतः काजू पिकाचे मोठे नुकसान झाल्याने त्यावर अवलंबून असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.