चतुर्थीत मळगांव रेल्वे स्टेशन येथून बससेवा सुरु करण्यासाठी मनसेच आगार व्यवस्थापकांस निवेदन

0
1131

सावंतवाडी : जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गणेश चतुर्थी दरम्यान सावंतवाडी- रेल्वे स्टेशन माळगांव येथून एस. टी. बस उपलब्ध करून देण्यासंबंधी  सावंतवाडी आगार व्यवस्थापकांस निवेदन देण्यात आले. माजी आमदार, मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर व मुंबईतील मनसे कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी कोकणात जादा रेल्वे गाड्यांची मागणी केली होती. ती मागणी मान्य करून १५० गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या, यावेळी येणाऱ्या चाकरमानी व गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून,  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रेल्वे स्टेशन माळगांव येथून एस. टी. बस उपलब्ध करून देण्यासंबंधी निवेदन देण्यात आले. सावंतवाडी रेल्वेस्टेशन मार्गे आंबोली,माणगाव-खोरे, वेंगुर्ला – शिरोडा व तुळस मार्गे अशा गाड्या उपलब्ध करून देण्यात यावा तसेच सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे कंट्रोलरची व्यवस्था करून कंट्रोलर उपलब्ध करून देण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्य,यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर, राजू कासकर, आषिश सुभेदार, अतुल केसरकर, गुरुदास गवंडे, महेश बांदिवडेकर, संतोष भैैरवकर ,मुकुंद परब,संदीप खानविलकर,सागर होडावडेकर आदि मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.