अपघातात पाय गमावलेल्या सचिनला सतीश सावंत यांनी दिला आधार

0
675

कणकवली : 2018 साली तोंडवली बावशी येथील युवक सचिन सावंत यांनी अपघातात आपला डावा गमावला व उजव्या पायाला ही अपंगत्व आल्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी त्याला स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आज इलेक्ट्रिक शिलाई मशीन उपलब्ध करून दिली यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले ,नगरसेवक कन्हैया पारकर ,संदेश पटेल , राजू शेटये,आनंद ठाकूर शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते

 

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी बहुतांश युवकांना मदतीचा हात दिला आहे त्यामुळे तोंडवली बावशी येथील युवक सचिन सावंत याने 2018 मध्ये अपघातात पाय गमावल्याने त्याच्यासमोर रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता त्यामुळे त्याने जिल्हा बँक अध्यक्ष श्री सावंत यांच्याकडे आपल्याला शिलाई मशीन मिळाल्यास आपणास रोजगार मिळू शकतो असे सांगितल्या ने सावंत यांनी त्याला इलेक्ट्रिक शिलाई मशीन उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे या मशीनचा उपयोग करून सचिन सावंत यांना भविष्यात स्वयंरोजगार उपलब्ध होणार असल्याने त्याने जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व शिवसेना नेत्यांचे आभार मानले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.