कडावल चितार आळीतील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त उत्सव

0
639
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील कडावल गाव (चितारआळी) याठिकाणी ३५ वर्षापूर्वी  कै. सुर्यकांत सावंत (कांता महाराज ) यांनी स्थापन केलेल्या हनुमान मंदिरात  भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री हनुमंताचे जागृत देवस्थान आणि  कै. सूर्यकांत सावंत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलल्या चितार आळीमध्ये सालाबादप्रमाणे या वर्षीही  दोन दिवसांचा उत्सव साजरा केला जाणार आहे. कडावल चितार आळीतील हनुमान मंदिरात दिनांक ३० मार्च १८ रोजी दुपारी  ४ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा , ७ वाजता  आरती, ८ वाजता  हरिपाठ,   महाप्रसाद रात्री ९ वाजल्यापासून  स्थानिक  विविध मंडळाची भजने, दुसऱ्या दिवशी  ३१ मार्च १८ रोजी पहाटे  काकड आरती, भुपाळी, पाळणागीत त्या नंतर अभिषेक, हनुमंताचे चरण दर्शन  असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तरी भाविकांनी व भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रमेश सुर्यकांत सावंत आणि राजन सुर्यकांत सावंत यांनी केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.