गरजवंत मुलींना रोजगाराभिमुख परिचारिका प्रशिक्षणाचे दालन म्हणजे अणावचे नर्सिंग काॅलेज : खा.सुरेश प्रभू

0
246

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १६ :

सिंधुदुर्गच्या गरीब, गरजू मुलींना आरोग्य क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून महाराष्ट्रातच नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. मानव संसाधन विकास संस्था संचलित नर्सिंग काॅलेजमधून बाहेर पडलेल्या. या जिल्ह्यातील शेकडो गरीब मुली आज पुणे, नाशिक, मुंबई आणि गोव्यातही काही नामांकित हाॅस्पिटलमध्ये गरजू रुग्णांना सेवा देत आहेत. २१ वर्षापूर्वी दुरदृष्टीने या संस्थेची स्थापना केली. आज त्याचा वटवृक्ष झालेला आपल्याला पहायला मिळतोय. नजिकच्या काळात बीएस्सी नर्सिंग आणि आरोग्य सुविधांशी निगडित अनेक पॅरामेडिकल कोर्सेस संस्थेच्या अणाव येथील भव्य संकुलात सुरू करण्यात येणार असून सध्य:स्थितीत सदरचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या सुविधांचा लाभही माझ्यावर प्रेम करून जनसेवेची संधी देणाऱ्या सर्व घटकांनी घ्यावा. असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री, खासदार आणि मानव संसाधन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी केले. आज अणावचअणाव येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या परिचारिका कोर्सच्या चाळीसहून जास्त विद्यार्थीनींचा शपथग्रहण सोहळा संपन्न झाला त्यावेळी खास. प्रभू बोलत होते.
आपल्या प्रास्ताविक संबोधनात मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांनी उपस्थित विद्यार्थी मुलीना भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ही संस्था म्हणजे एक कुटुंब असून या संस्थेच्या विकासात्मक कामात सगळ्यानी सेवाभावी वृत्तीने काम करूया असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला काॅनबॅकचे संजीव कर्पे, मोहन होडावडेकर, ल्युपिन फाऊंडेशनचे योगेश प्रभू, अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर, रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते राजू सावंत, जनशिक्षणचे विजय केनवडेकर, परिवर्तन केंद्राचे जिल्हा समन्वयक विलास हडकर नर्सिंग काॅलेजचे प्राचार्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आभार प्रदर्शन नर्सिंग काॅलेजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.मडव यांनी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.