नेमळे हायस्कुलसमोर ग्रामस्थ, लोकप्रतिनिधीचे जाहीर निषेध आंदोलन सुरू

0
737

सावंतवाडी : नेमळे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला संचालक मंडळ पाठीशी घालत असल्याचा ग्रामस्थांनी आरोप करत मंगळवारी सकाळ पासून शाळेसमोर सरपंच विनोद राऊळ ग्रामस्थ व मुलीच्या आई वडिलांनी निषेध आंदोलन छेडले. नेमळे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला संचालक मंडळ पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तसेच या विरोधात हायस्कूलसमोरच निषेध आंदोलन छेडले. सदरच्या शिक्षकांला संचालक मंडळ पाठीशी घालत असून याबाबत बुधवारी शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे निषेध कर्त्यानी सांगितले. याबाबत संस्था अध्यक्षांंना विचारणा केली असता न्यायालयाने शिक्षकाला दोषी ठरविल्यास संस्था कारवाई करणार असल्याचे अध्यक्ष आत्माराम राऊळ यांनी सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.