दुहेरी हत्याकांड | संशयित कुशल टंगसाळी याला पुन्हा १ दिवसाची पोलीस कोठडी

0
344

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १८ :

उभाबाजार येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित कुशल टंगसाळी याला पुन्हा १ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुन्ह्यातील तपास कामासाठी सावंतवाडी पोलिसांना त्याची गरज असून तसे आदेश सायंकाळी न्यायालयाने दिले. मात्र, उशीर झाल्यामुळे शुक्रवारी त्याला न्यायालयीन कोठडीतून पोलीस कोठडीत घेतले जाणार आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान, गुन्ह्यातील तपासाची प्रक्रिया पूर्ण करायची असून अधिकचा तपास करायचा असल्यामुळे त्याला पुन्हा पोलिस कोठडीत घेतले अशी माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.

यातील संशयित कुशल टंगसाळी यानं दुहेरी हत्याकांड प्रकरणी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी सर्व तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे अधिकच्या पोलीस कोठडीची गरज नाही, असे सांगून त्याला एक दिवस पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. परंतु त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत संशयितांचे वकील संकेत नेवगी यांनी आपली बाजू मांडली. यापूर्वी पोलिसांनी ९० टक्के तपास झाला असून संशयितांविरुद्ध कोणताही ठोस पुरावा उपलब्ध होत नाही. त्यामुळे संशयितांविरुद्ध पुरावे मिळत नसल्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारे पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा पोलिस कोठडीत घेण्याची गरज काय ? असा सवाल केला. यावेळी सरकारी पक्षातर्फे अँड. वेदिका राऊळ यांनी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. काही तपास अजूनही बाकी आहे. कायद्याच्या तरतुदीनुसार संशयिताला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी मधून पोलीस कोठडीत घेता येते. त्यामुळे त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. त्यामुळे संशयित कुशल टंगसाळी याला पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.