स्क्वॅशमध्ये दीपिका पल्लिकलला कास्य पदक

0
345

जकार्ता : जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत भारताने आजच्या दिवासातले पहिले पदक जिंकले. भारताची महिला स्क्वॅशपटू दीपिका पल्लिकलने कास्य पदक जिंकत भारताची पदकसंख्या २६ वर नेली.महिला स्क्वॅश एकेरी प्रकारात भारताची दीपिका पल्लिकल जोशना चिनप्पा या सेमीफायनलमध्ये पोहचल्या होत्या त्यामुळे भारताची दोन पदके निश्चित झाली होती. दोघीही सेमीफायनलमध्ये पोहचल्याने भारताच्या सुवर्ण किंवा रौप्य पदकाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण, दीपिका आपला सामना ३-० असा हारल्याने कास्य पदकावर समाधान मानावे लागले. जोशना चिनप्पाकडून महिला स्क्वॅश एकेरी सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकण्याची  आशा आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.