केंद्रीयमंत्री नारायण राणे उद्या सावंतवाडीत

0
135

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. 21 

केंद्रीय सुक्ष्म, लघु व‌ मध्यम उद्योग मंत्री खा. नारायण राणे उद्या ठीक 2 वाजता सावंतवाडीत दाखल होणार आहेत. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली आदिनारायण मंगल कार्यालय सालईवाडा सावंतवाडी येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळीसर्व नगरसेवक,सर्व मोर्चा, आघाड्यांचे पदाधिकारी, शक्तिकेंद्रप्रमुख, बुथप्रमुख आणि सर्व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.