डिगस गावठणवाडी येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
458

कुडाळ | प्रतिनिधी | दि. २२ :

कुडाळ तालुक्यातील डिगस गावठणवाडी येथील मुकेश उदय पवार (२१) या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास घडली. या युवकाचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी एकटाच असताना या युवकाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी पाच वा.च्या सुमारास घरात या युवकाची आई आल्यावर तिने आपल्या मुलाला घरात घरात गळफास लावलेल्या स्थितीत पाहिले. यानंतर या घटनेची माहिती कुडाळ पोलिसांना मिळताच कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. माने, श्री. झोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या आत्महत्ये मागचे नेमके कारण समजू शकले नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.