निलेश साबळे यांनी ‘यासाठी’ व्यक्त केली नारायण राणेंची दिलगिरी

0
1986

मुंबई | ब्युरो न्यूज | दि. २२ :

‘चला हवा येऊ द्या’ चे सूत्रसंचालक निलेश साबळे व टीम ने नुकतीच केंद्रीय मंत्री  नारायण राणे यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. नुकत्याच झी टीव्ही वर झालेल्या ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रमात राणे साहेबांचे जे पात्र दाखविण्यात आले होते त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या, अनेक कार्यकर्त्यांनी झी टीव्ही आणि साबळे यांना फोन करून संताप व्यक्त केला होता. त्यामुळे  साबळे व टीमने राणे साहेबांच्या अधिश निवासस्थानी येऊन भेट घेतली व दिलगिरी व्यक्त केली. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते.

राणे साहेब हे ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे रसिक प्रेक्षक आहेत त्यांनी कलाकारांचा नेहमी सन्मान केला आहे. अशावेळी एखादी व्यक्तिरेखा साकारताना कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता परत अशी चूक होणार नाही असे निलेश साबळे यावेळी म्हणाले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.