अर्जुन पुरस्कारप्राप्त हिमानी परब हिचे परब मराठा समाजाच्या वतीने खास अभिनंदन

0
57

दोडामार्ग | प्रतिनिधी | दि. २२ :

परब मराठा समाजाचे सभासद उत्तम परब व सौ उमा परब यांची सुकन्या कुमारी हिमानी परब हिला अत्यंत प्रतिष्ठेचा असा अर्जुन पुरस्कार प्राप्त झाल्याने तिचे शिवाजी पार्क, दादर येथील निवासस्थानी परब मराठा समाजाच्या वतीने खास अभिनंदन करण्यात आले.

यावेळी परब मराठा समाजाचे सरचिटणीस जी. एस. परब, युवा मंचाचे प्रमुख सुनील धोंडू परब, डॉ. प्रिया लाड, गिरीश परब व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मल्लखांब खेळात देशपातळीवर व जागतिक स्तरावर हिमानी परब हिने केलेल्या गौरवास्पद वाटचालीची दखल घेऊन केंद्र सरकारने तिला सर्वोच्च राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार नुकताच प्रदान केला आहे. कु. हिमानी उत्तम परब हिला आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय मल्लखांब पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, मुंबई जिल्ह्याचा सर्वोच्च खेळाडू पुरस्कार व अनेक गोल्ड मेडल्स आत्तापर्यंत मिळालेली आहेत. त्यामुळे तिला पुढील कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा देण्यासाठी परब मराठा समाजाने तिचे खास अभिनंदन केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.