अभिनेता कमल हसन यांना कोरोनाची लागण

0
29

चेन्नई | ब्युरो न्यूज | दि. २२ :

ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कमल हसन अमेरिकेहून भारतात दाखल झाले आहेत. कोरानाची लागण झाल्‍याची माहिती त्‍यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून चाहत्‍यांना दिली.
‘कोरोना महामारी अद्‍याप संपलेली नाही’-
कमल हसन यांनी ट्वीटमध्‍ये म्‍हटलं आहे की, मी नुकताच अमेरिकेतून भारतात परतलो. मला थोडा खोकला येत होता. मी चाचणी केली. यामध्‍ये मला कोरोनाची लागण झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. मी रुग्‍णालयात दाखल झालो आहे. कोरोना महामारी अद्‍याप संपलेली नाही, हे सर्वांनी लक्षात घ्‍यावे, सर्वांनी काळजी घ्‍यावी, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे. कमल हसन यांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने कृषी कायदे रद्‍द करण्‍याच्‍या निर्णयाचे कमल हसन यांनी स्‍वागत केले होते. अखेर देशातील शेतकर्‍यांचा विजय झाला, असे त्‍यांनी म्‍हटले होते. कमल हसन यांच्‍या मक्‍कल निधि मय्‍यम या राजकीय पक्षानेही कृषी कायदाचा तीव्र विरोध केला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.