अंगारकी निमित्त भाविकांनी घेतले रेडी गणपतीचे दर्शन | देवस्थान कमिटीचे उत्तम नियोजन

0
51

सिंधुदुर्ग LIVE | ब्रेकिंग न्यूज
www.sindhudurglive.com

वेंगुर्ला | प्रतिनिधी | दि. २३  आज अंगारकी संकष्टी निमित्त भाविकांनी रेडी येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले// सकाळी ७ वाजल्यापासून रेडी गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या// श्री गजानन देवस्थान रेडी यांच्या मार्फत भाविकांना दर्शनासाठी उत्तम नियोजन करण्यात आले होते// कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायजर व इतर नियमांचे पालन करून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला// सिंधुदुर्ग जिल्ह्यासाहित गोवा, कर्नाटक, मुंबई, पुणे व इतर ठिकाणच्या भाविकांनी आज श्री गणेशाचे दर्शन घेतले// दरम्यान परिसरात गणेश भक्तांसाठी मोफत साबुदाणा खिचडी व केळ्यांचे वाटप करण्यात आले होते// आज सकाळी ७ पासून श्री गणेश भक्तमंडळ, गडहिंग्लज यांच्यामार्फत हे आयोजन करण्यात आले होते// गेली २७ वर्षे या मंडळामार्फत मोफत केळी व साबुदाणा खिचडी याठिकाणी वाटण्यात येतात// कोरोनाचा जिल्ह्याबाहेरील भाविकांना गेली २ वर्षे श्री गणेशाचे दर्शन घेता आले नाही// यावर्षी शासनाने नियम शिथिल केल्यामुळे या भाविकांना आज अंगारकी संकष्टी निमित्त श्री गणेशाचे दर्शन घेता आले//

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.