मंत्री ना. छगन भुजबळ डिसेंबरमध्ये सिंधुदुर्ग दौऱ्यावर

0
120

कणकवली | प्रतिनिधी | दि. २५ :

मंत्री ना. छगन भुजबळ डिसेंबरमध्ये सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असल्याचे राष्ट्रवादी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राज राजापूरकर यांची राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी त्यानी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राज राजापूरकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी संघटनेच्या आढावा बैठकीसाठी सिंधुदुर्गात आले होते. या दौऱ्यादरम्यान राजापूरकर यांनी आवर्जून राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट दिली.या भेटीदरम्यान राजापूरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी संघटनेबाबत सविस्तर चर्चा केली.राष्ट्रवादी काँग्रेसची मुलूखमैदान तोफ ना. छगन भुजबळ हे येत्या 7 ते 8 डिसेंबर दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राजापूरकर यांनी अबिद नाईक यांना दिली. अबिद नाईक यांनी राजापूरकर यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.यावेळी दिलीप वर्णे, बाबू वळंजू, गणेश चौगुले, विशाल ठाणेकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.