सहकलाकारांनी वजनावरून खिल्ली उडवल्याने ‘शेवंता’ ने सोडली मालिका !

0
634

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. २५ :

झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या तिसऱ्या पर्वातून शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर बाहेर पडणार असल्याच्या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. अपूर्वा नेमळेकर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. मालिका का सोडणार..? याबाबत तिने चक्क तीन पानांचा खुलासा लिहून आपल्या चाहत्यांसाठी चक्क आपबिती कथन केलेली आहे असे वाटते. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत आपली आवडती कलावंत शेवंता दिसणार नाही हे आता कन्फर्म झाल्याने शेवंताच्या तमाम चाहत्यांना अत्यंत धक्का बसल्याचे समजते आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून अनेकांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पहिल्या पर्वा पासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेतील शेवंताच्या भूमिकेने तर अनेकांना भुरळ घातली. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने बजावलेल्या शेवंताच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अपूर्वाच्या सौंदर्यामुळे तर ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरली शिवाय तिच्या अभिनयानेही प्रेक्षकांना आपलेसे केले. तिसऱ्या भागातही शेवंता चर्चेत राहिली आहे. शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने तब्बल बारा किलो वजन वाढवले. पण दुर्दैवाने हेच वजन तिला मालिका सोडण्याचे प्रमुख कारण ठरले आहे. तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिला सहकलाकारांकडून कसे टोमणे खावे लागायचे, त्याला कंटाळून मी कशी मालिका सोडत आहे, या सर्व त्रासाबाबत तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तीन पानी पत्र लिहून प्रेक्षकांना कळवले आहे.

“शेवंता बस नाम ही काफी है..!”
आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये अपूर्वा नेमळेकरहिने “शेवंता.. बस नाम ही काफी है..पर कभी कभी इतना ही काफी नहीं होता..!” असे लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.