सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. २५ :
♦️ वेतनवाढीच्या प्रस्तावानंतरही तिढा; कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम; आज निर्णय; वेतनवाढीच्या निर्णयानेही एसटी कर्मचाऱ्यांचे समाधान झालेले नाही.
♦️ कोरोना काळात मध्य रेल्वेने मेल, एक्स्प्रेस गाड्यांना थांबा असलेल्या मुंबईतील सहा स्थानकांचे फलाट तिकीट दर पूर्ववत करण्याचा घेतला निर्णय; आता ५० रुपयांऐवजी फलाट तिकीट पूर्वीप्रमाणे १० रुपये होणार.
♦️ खोटे दस्तावेज तयार करुन सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश.
♦️ मुंबई, धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्त पदांसाठी तसेच १०५ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान; २२ डिसेंबरला मतमोजणी.
♦️ महाराष्ट्रात बुधवारी १,०४३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.तर ९६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण( रिकव्हरी रेट ) ९७.६८ टक्के एवढा झाला आहे.
♦️ मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील खचलेल्या रस्त्याची अद्याप डागडुजीही करण्यात आली नसल्याने वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक बनला आहे.
♦️ विमा महागल्याने संत्रा उत्पादक संकटात; आधी हेक्टरी चार हजार, आता हेक्टरी १२ हजार रुपये; कोरोना काळात संत्र्याला शेतकऱ्यांना मातीमोल भावात विकावा लागला.
♦️ माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील तपासाशी संबंध नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा; सीबीआयच्या आरोपाचे खंडन
♦️ कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज; केंद्र सरकारचे १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र; चाचण्यांची संख्या घटल्याने चिंता.
♦️ भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका : अजिंक्य रहाणेच्या दुहेरी कौशल्याची कसोटी; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्याला आजपासून प्रारंभ.