डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी राष्ट्रपती देतील आंबडवेतील स्मारकास भेट

0
27

रत्नागिरी | ब्युरो न्यूज | दि. २५ :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड) येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येथे ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भेट देणार आहेत.
भेटी दरम्यानच्या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन याबाबत बुधवारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात सर्व संबधित विभागांनी करावयाच्या कामांबाबत चर्चा झाली.
राष्ट्रपती ३ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात येत असून त्यात ते आंबडवे गावात असणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकास भेट देणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.