ST संप | फक्त दोन दिवस, अन्यथा कारवाई अटळ | अनिल परबांचा शेवटचा इशारा

0
111

मुंबई | दि. 25

दोन दिवसात कामावर रुजू व्हा अन्यथा बडतर्फीची कारवाई सुरु करणार आहोत, असे एसटी प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांना बजावण्यात आले आहे. दोन दिवसांचा अल्टीमेटम एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. लेखाजोखा मांडला आहे. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. कामगारांना कामावर यायचे आहे, उद्या सकाळपर्यंत वाट पाहणार आहोत, त्यानंतर कारवाई अटळ आहे, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकऱ्यांना दिला आहे.

राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. तुमच्या ज्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत. आता मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. कामगारांना कामावर यायचे आहे. आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहून त्यानंतर महामंडळ निर्णय घेईल की पुढं कसं जायचं ते. संप मागे घेवून कामावर रूजू व्हावे. जे संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आता अनिल परब यांनी दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारचे ऐकावे. तुटेपर्यंत तुटू नये, नंतर जोडता नाही येणार. जर काही राहिले असेल तर समितीसमोर मांडा. संप करून जनतेला वेठीला धरू नका. माझा संबंध कामगारांशी आहे, त्यांची लिडरशीप कुणी करायची हा त्यांचा प्रश्न आहे, यावेळी अनिल परब म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.