धुळे येथील जवान मिलिंद खैरनार काश्मीरमध्ये शहीद

0
107

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. २५ :

काश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पहाटे चकमक झाली. या चकमकीत महाराष्ट्रातील धुळ्याचे जवान मिलिंद किशोर खैरनार शहीद झाले आहेत. दहशतवादी-जवानांमध्ये झालेल्या चकमकीत गरुड कमांडो मिलिंद किशोर खैरनार यांना वीरमरण आले असून मिलिंद खैरनार यांनी
२६/११ च्या ताजमहल हॉटेलच्या मुंबई येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी नरीमन पाँईट येथे हेलिकाँप्टरमधून स्लँपवर जंप करून दहशतवादी कारवाया संपविण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. शहीद मिलिंद खैरनार यांच्या वीर मरणाबद्दल खानदेशातून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.