धक्कादायक घटना | लॉजमध्ये विवस्त्र आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह

0
390

पुणे : दि. २५ : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेयसीचा खून करून प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचा मृतदेह हा दिघीमधील एका लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामधील ३० वर्षीय आरोपी प्रकाश ठोसरने आधी प्रेयसीचा खून करून नंतर आत्महत्या केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून मयत प्रकाश ठोसर आणि ३० वर्षीय विवाहित महिलेचे प्रेमसंबंध होते. ते दोघे दिघी परिसरातील एका लॉजमध्ये नेहमी भेटायचे. हे दोघे अनेकदा रात्री मुक्कामी यायचे आणि सकाळी निघून जायचे असं पोलिसांनी सांगितले आहे.

 

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.