कानपूर कसोटी | पहिल्या दिवस अखेर भारताच्या 4 बाद 258 धावा

0
45

कानपूर | दि. २५ :

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारताचा सलामी फलंदाज शुभमन गिल, मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर, अष्टपैलू रवींद्र जाडेजा यांच्या दमदार अर्धशतकांमुळे भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 गडी बाद 258 धावा उभारल्या आहेत. सलामी फलंदाज शुभमन गिल व मयंक अग्रवाल ने आज डावाची सुरुवात केली. मयंक वैयक्तिक 13 धावांवर बाद झाल्यावर भारताचा काहीसा डाव गडगडला. मात्र मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी दमदार फलंदाजी केली. अजिंक्य रहाणे नव्या कर्णधाराच्या भूमिकेत खेळत असून भारताने पहिल्या दिवशी चार बाद 258 धावा उभारून आश्वासक धावसंख्येचा पाया रचला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा 50 धावा आणि श्रेयस अय्यर 75 धावा करुन नाबाद खेळत आहेत. उद्या दोन्ही फलंदाज शतके करतात की काय? याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.