आनंदाची बातमी | पी.व्ही सिंधूची इंडोनेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक | जर्मनीविरुद्ध एकहाती विजय..

0
17

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. २६ :

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने गुरुवारी जर्मनीच्या यव्होने ली विरुद्ध सामन्यात एकहाती विजय मिळवलाय. या विजयासह पी.व्ही सिंधूने इंडोनेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिलीय. या सामन्यात तिनं जगातिक स्तरावर 26 क्रमांकावर असलेल्या यव्होने ली ला 37 मिनिटांत 21-12 आणि 21-18 फरकानं पराभूत केलंय.
आज पहिल्यांदाच यव्होने ली विरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात पी.व्ही सिंधू सुरुवातीपासूनच पूर्णपणे नियंत्रणात दिसली. मात्र, दुसऱ्या फेरीत लीनं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या फेरीत दोघांना समान गुण मिळाले. मात्र, पुढच्या फेरीत सिंधुनं आक्रमक खेळी करून हा सामना जिंकलाय. इंडोनेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधुचा स्पेनची बिट्रिज कोरालेस आणि दक्षिण कोरियाची सिम यू-जिन यांच्याशी भिडणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.