‘एल्गग्या माय’ ची एक्झिट !

0
188

कुडाळ | प्रतिनिधी | दि. २६ :

कुडाळ मच्छीमार्केट मध्ये ‘एलग्या माय’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ७५ वर्षीय एलिजा फर्नांडिस यांचे गोवा येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले.

कुडाळ शहरातील मच्छी मार्केट मध्ये गेली अनेक वर्ष कुडाळ येथील एलिजा फर्नांडिस या मासे विक्रीचा व्यवसाय करीत होत्या या मच्छी मार्केटमध्ये त्यांना ‘एलग्या माय’ म्हणून संबोधले जात होते. त्याच नावाने प्रसिद्ध होत्या. परप्रांतीय व्यवसायिक याठिकाणी जर आला तर त्याला विरोध करून स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे धारिष्ट एलग्या माय मध्ये होते. त्यामुळे स्थानिक मासे विक्रेत्या महिलांना तिचे संरक्षण होते. तिच्या निधनाने मासे विक्री करणाऱ्या अनेक महिलांनी हळहळ व्यक्त केली. स्थानिकांना प्राधान्य देणाऱ्या त्या मासे विक्रेत्या म्हणूनही मासे विक्रेत्या महिलांमध्ये नावाजलेल्या होत्या. महिन्याभरापूर्वीच त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.