कंट्रोल केबिन उघडून एसटी बसेस सुरु करण्याचा डाव मनसेने उधळला

0
261

कणकवली | प्रतिनिधी | दि. २६ :

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेत नाहीत हे समजताच सरकारने कर्मचार्‍यांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू केले आहे आणि त्यामुळेच गुरुवारी  कणकवली बस स्थानकातील काही फुटीर कर्मचाऱ्यांनी कंट्रोल केबिन चालू करून एसटी बसेस चालू करण्याचा डाव आखला होता. तो मनसेने हाणून पाडला व कंट्रोल केबिन मधील विनय राणे या एसटी कर्मचाऱ्याला कंट्रोल केबिन बंद करायला लावली.

गुरुवारी सायंकाळी काही एसटी कर्मचाऱ्यांनी कणकवली बस स्थानकातील कंट्रोल केबिन चालू करून उद्यापासून गाड्या सुरु होणार असे सांगितले त्याची माहिती मिळताच कणकवली मनसे कार्यकर्ते बस स्थानकात दाखल होत संप मिटत नाही तोपर्यंत कंट्रोल केबिन बंद ठेवा असे सांगत कंट्रोल केबिन बंद करण्यास भाग पाडून एसटी गाड्या बाहेर पडल्या तर मनसे आक्रमक पाऊल उचलणार असल्याचा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला.

सरकार काही एसटी अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट वाढण्याचा केविलवाणा प्रयोग काम करत आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्याना मनसे बांधील असुन कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळे पर्यंत मनसे एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम राहील असे मेस्त्री यांनी सांगितले यावेळी दत्ताराम बिडवाडकर ता. अध्यक्ष, संतोष कुडाळकर, ता. सचिव, अनंत अचरेकर, अरविंद घाडिगावकर, सुनील सोनार, संजय घाडीगावकर उपस्थित होते

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.