गणेश राणे अजित कांबळे यांची ‘आत्मा’ समितीवर निवड

0
168

देवगड | प्रतिनिधी | दि. २६ :

जिल्हास्तरीय शेतकरी आत्मा समिती सभा प्रकल्प संचालक (आत्मा) सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात जिल्हा कृषी अधीक्षक मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत जिल्हास्तरीय आत्मा कार्यकारी समिती, आत्मा नियामक मंडळ, राज्य शेतकरी सल्ला समिती सदस्य निवड करण्यात आली.
यावेळी देवगड तालुक्यातील पंचायत समिती सदस्य अजित कांबळे व जि.प.सदस्य गणेश राणे यांची जिल्हास्तरीय आत्मा नियामक मंडळावर निवड करण्यात आली.या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, सदर समितीची सभा दर 3 महिन्याने होत असते

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.