पायवाटेने जात असताना दगड फेकून मारल्याने जखमी | देवगड पोलिसात गुन्हा दाखल

0
242

देवगड  | प्रतिनिधी | दि. २६ :

ओंबळ गावठणवाडी येथील सौ.दिपीका दिलीप पवार(४५) यांना शिवीगीळ करून दगडाने मारून जखमी केल्याप्रकरणी तेथिलच सौ.नलिनी नंदकुमार गावडे(५०) यांच्याविरूध्द देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ही घटना २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा.सुमारास ओंबळ गावठणवाडी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ओंबळ गावठणवाडी येथील सौ.दिपीका दिलीप पवार(४५) यांनी शासकीय प्रकल्पातून काजू लागवड केली त्या ठिकाणी कृषी अधिकारी पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी सौ.पवार या तेथिलच नलिनी नंदकुमार गावडे यांच्या घराशेजारी असणाऱ्या पायवाटेने काजूबागेकडे जात होत्या.
यावेळी नलिनी गावडे यांनी शिवीगाळ करून दगड उचलून फेकून हातावर मारून दुखापत केली व मारण्याची धमकी दिली अशी तक्रार सौ.पवार यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी सौ.गावडे यांच्याविरूध्द भादवि ३३६, ३३७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पो.हे.कॉ.राजन जाधव करीत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.