ब्रेकिंग न्यूज | मुंबईकर श्रेयस अय्यरचे कसोटी क्रिकेटमधील पदार्पणातच शतक

0
138

कानपूर | दि. २६ :

येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मुंबईचा शैलीदार फलंदाज श्रेयस अय्यरने कसोटी पदार्पणातच शतकी खेळी केली आहे. सध्या तो १०४ धावांवर नाबाद खेळत असून रविचंद्रन अश्विन ४ धावांवर खेळत आहे. भारताने ६ गडींच्या मोबदल्यात २९२ धावा उभारल्या आहेत. भारताचे अजून चार गडी शिल्लक असून तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन श्रेयस द्विशतकी खेळी करतो काय? याकडे सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.