‘महाराष्ट्रात डिव्होर्स खूप होतात’ | अपूर्वानं का सोडली मालिका ?, नवी शेवंता कोकणातली

0
570

सावंतवाडी | दि. 28 

रात्रीस खेळ चाले या मालिकेन जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मालिकेतील पात्रांनी देखील प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. अशातच शेवंताची भुमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीन मालिकेला ‘जय महाराष्ट्र’ केला. प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहून देखील कष्टाचा मोबदला न मिळाल्यानं तीन प्रोडक्शन हाऊसवर आरोप करत मालिकेतून ‘एक्झिट’ घेतली. तीन मालिका सोडल्याच समजताच तीचे फॅन्स, फॉलोअर्सचा देखील नाराज झालेत. सोशल मिडियावर मिम्सच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, काल रात्रीस खेळ चालेच्या सेटवर निर्माते सुदेश भोसले, दिग्दर्शक राजू सावंत यांसह कलाकारांची पत्रकार परिषद आयोजित केली गेली. यावेळी उपस्थित त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी अपुर्वाच्या मालिका सोडण्याबाबत विचारलं असता ‘महाराष्ट्रात डिव्होर्स खुप होतात. तर काही लग्न टिकतात, ती का टिकतात ? तर त्यांच्यातील चांगल्या गोष्टी बघतात ती लग्न टिकतात. तर आपसातील एकमेकांच वाईट काढत राहतात त्यांचे डिव्होर्स होतात’ असं उत्तर दिल गेलं.

नवी शेवंता कोकणातली

तर अपुर्वाच्या जागी नवी शेवंता म्हणून सध्या मुंबईत नाटक, सिनेमात भुमिका साकारणारी मुळची कुडाळ-पिंगूळी येथील कृतिका तुळसकर साकारणार आहे अशी माहिती दिली गेली. त्यामुळे जुन्या शेवंताची जागा नवी शेवंता घेणार का ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.