मिस करतो बाबा ! | बाबांच्या आठवणीने तेजस्विनी पंडित भावूक

0
110

मुंबई | ब्युरो न्यूज | दि. 28 

मराठीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित कायमच सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असते. फोटो शूट, नवीन प्रोजेक्ट याबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. आपल्या कामाव्यतिरिक्त राजकीय घडामोंडीवर वक्तव्य करण, सामाजिक कार्य यासाठी तिची वेगळी ओळख आहे. मात्र, आज तेजस्विनी काहीशी भावूक झालीय. आपल्या बाबांच्या वाढदिनी तिने ही पोस्ट लिहिलीय. अजूनही miss करतो म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्यात.

काय आहे पोस्ट ? 

मला अनेकांनी विचारलं तुझं prized possession काय आहे…..?!
घड्याळ, अंगठ्या, कपडे, पर्स,soft toys की आणखी काही…..
काय असं आहे जे तू कधीच कुणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल…!
तर ह्या त्या 2 गोष्टी आहेत.
माझं माझ्या बाबांवरचं प्रेम सगळ्यांनाच माहीत आहे
बाबा ने मला माणूस म्हणून घडवलं….बाबाने मला संस्कारासोबत आणखी काय दिलं तर एक चांगला Cook होण्याचा वारसा बाबा देऊन गेला, ठेऊन गेला….
हे 2 चमचे आमच्याकडे माझा जन्म झाला तेंव्हापासून आहेत. आम्ही मोठ्या होत असताना बाबा catering student आणि कामाला चहा कंपनी मध्ये होता म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला चहा करायला शिकवला. आमच्याकडे चहा वेगळ्या पद्धतीने बनतो. आणि तो perfect लागतो असं मला वाटतं.
त्या चहा पावडर च्या मापाचा हा एक चमचा. आणि दुसरा तो साखरेचा चमचा. त्याची दांडी तुटली आहे . पण आजतागायत तो चमचा कधी replace झाला नाही. कारण स्वयंपाकातील “प्रमाण” ह्याचं आमच्या घरी जाम महत्व….
हे चमचे फक्त माझ्या बाबाची आठवण नसून आमच्या संस्कारातल्या , शिकवणीचं प्रमाण आहे. ज्यावर माझं “प्रमाणाबाहेर” प्रेम आहे.
तोलून मापून चहा करता येईल पण बाबावरचं माझं प्रेम मोजता येणं निव्वळ अशक्य !

आज त्याच्या वाढदिवसा निमित्त लिहावसं वाटलं कारण बाबा चे खूप photos नाहियेत आमच्याकडे. कॅमेरा चं महत्व मला कळायच्या आधीच त्याने exit घेतली.
आजही तुला तितकंच miss करतो आम्ही बाबा !
जिथे कुठे असशील, देव बरे करो…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.