अवैध दारू वाहतुक | गुजरातमधील दोघांना अटक

0
116

बांदा : दि. २८ :  इन्सुली येथील उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी आज सायंकाळी उशिरा केलेल्या अवैध दारू वाहतुकीच्या कारवाईत ३ लाख ७५ हजार ४०० रुपये किमतीच्या दारुसह एकूण १५ लाख ७५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक संधी दिलावर मामदभाई (वय २२, रा. जुनागड, गुजरात) व क्लिनर कांतीभाई धांजीभाई हंडा (वय ४३, रा. राजकोट-गुजरात) यांचेवर अटकेची कारवाई करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोव्यातून गुजरातच्या दिशेने टेम्पोतून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, त्यानुसार इन्सुली तपासणी नाक्यावर प्रभारी जिल्हा अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपअधीक्षक आर ए इंगळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, रमाकांत ठाकूर, शिवशंकर मुपडे, संदीप कदम, दुय्यम निरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकाने सापळा रचला होता. अधिक तपास दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील करीत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.