सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग ‘छत्रपती चषक 2021’ चा ऍरॉन 11 रेडी संघ मानकरी

0
236

वेंगुर्ला: छत्रपती मित्रमंडळ कॅम्प – भटवाडी आयोजित सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग “छत्रपती चषक २०२१ चा “ऍरॉन ११ रेडी” संघ ठरला मानकरी// तर “सुपर स्कॉड परबवाडा” संघाने उपविजेतेपद पटकावले// रेडी संघाला अंतिम चेंडूत १ धाव विजयासाठी आवश्यक असताना रेडी एक्क्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरेश कांबळी याने १ धाव काढत रेडी संघाला विजेतेपद मिळवुन दिले// ऍरॉन ११ रेडी व सुपर स्कॉड परबवाडा संघात झालेला अंतिम सामना चुरशीचा ठरला// हा सामना पाहण्यासाठी शेकडो प्रेक्षक मैदानात तर यू ट्यूब च्या माध्यमातून सुमारे ३ हजार प्रेक्षक उपस्थित होते// या स्पर्धेत टी.टी.एम.एम कुडाळ संघाला तृतीय तर आदी, आर्यन देवली संघाला चौथा क्रमांक देऊन गौरविण्यात आले// तर संपूर्ण स्पर्धेत १२ विकेट व रेडी संघाला अंतिम विजेतेपद मिळवून देणाऱ्या गौरेश कांबळी याला मालिकाविराचा ‘किताब देऊन गौरविण्यात आले// तसेच स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून विकास कदम (७० धावा), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बाळा सावळ (११ गाडी बाद), उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून गोपाळ बटा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आशिष शिरोडकर, उदयोन्मुख खेळाडू म्हणून ओंकार शिंदे, अंतिम सामना सामनावीर म्हणून गौरेश कांबळी तर
सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या (१४ षटकार ) दर्शन बांदेकर याला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले// वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगराध्यक्ष प्रसंन्ना कुबल, नगरसेवक सुहास गवंडळकर, नागेश गावडे, जि.प. सदस्य दादा कुबल, प्रीतम सावंत, समीर कुडाळकर, जयप्रकाश चमणकर, संजय पुनाळेकर, हेमंत गावडे, कर्मीस आल्मेडा, रोहित रेडकर यांच्यासाहित इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला// छत्रपती मित्रमंडळ कॅम्प – भटवाडी च्या सर्व सदस्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यात मेहमत घेतली//

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.