सडूरेतील कै.बिरू शिवाजी काळे यांच्या कुटुंबाला नितेश राणेंची आर्थिक मदत

0
174

वैभववाडी | दि. 28 

सडूरे गावातील काळे कुटुंबाला आ.नितेश राणे आर्थिक साह्य केले. कै.बिरू शिवाजी काळे यांच्या निधनानंतर पोरके झालेल्या काळे कुटुंबाला आ.राणे यांनी आधार दिला आहे.काळे परिवाराने आ.नितेश राणे यांचे आभार मानले.

. कै.बिरू शिवाजी काळे यांचे आकस्मिक निधन झाले होते.काळे हे १४ सप्टेंबर रोजी शेतात जातो असे सांगून घरातून निघून गेले होते. मात्र ते त्या दिवसापासून बेपत्ता झाले होते.त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह सुख नदीपात्रात लगत भेटला.त्यांचा नदीच्या पुरात वाहून मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.भिरु काळे यांच्या निधनामुळे काळे कुटुंबाचा आधारवड निघून गेला होता. त्यात घराची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबियांवर मोठ संकट आले. या घटनेची कल्पना भाजप भटके-विमुक्त आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी आमदार नितेश राणे यांना दिली .वैभववाडी दौऱ्यावर आलेल्या आमदार नितेश राणे यांनी काळे कुटुंबांच सांत्वन केले.तसेच मनोज काळे यांच्याकडे आर्थिक मदत सुपुर्द केली. तसेच यापुढे कोणतीही मदत लागल्यास हक्काने सांग अस वचन देखील दिले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजपा जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, भटके-विमुक्त आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे,कोकिसरे गावचे सरपंच दत्ताराम सावंत, बंड्या मांजरेकर, संजय सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.