ओमिक्रॉनचा धोका | मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

0
452

मुंबई | प्रतिनिधी | दि. 28 

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. ओमिक्रॉन (Omicron) असं या विषाणूनचं नाव आहे. हा विषाणूचा अधिक वेगानं प्रसार होत असून तो अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत महत्वाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, अशी सूचना प्रशासनला दिल्या आहेत. तसंच पुन्हा एकदा लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावी लागतील, असं इशारावजा आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.