न्यूझीलंडचा 62 धावातच पाडला फडशा | भारताचे गोलंदाज ठरले प्रभावी

0
257

मुंबई | ब्युरो | दि. ४ :

येथे खेळल्या जात असलेल्या दुसर्‍या व अंतिम कसोटीत आज दुसऱ्या दिवशी भारताने पाहुण्या न्यूझीलंडला केवळ 62 धावातच ऑल आउट करून तब्बल 263 धावांची आघाडी प्राप्त केली आहे. पहिल्या डावात भारताला 325 धावात गुंडाळणाऱ्या एकट्या एराज पटेल या गोलंदाजाचे यश न्यूझीलंड संघाला आनंद देऊ शकले नाही. कारण भारताने त्यांचा फक्त 62 धावतच खुर्दा पाडला आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन याने चार गडी बाद केले तर मोहम्मद सिराज ने तीन गडी बाद केले. न्यूझीलंडकडून सलामीवीर टॉम लॅथम व गोलंदाज जेमिसन या दोघांनाच दुहेरी धावसंख्या उभारता आली. न्यूझीलंडचे तब्बल नऊ खेळाडू एकेरी धावा काढून बाद झालेत. यात तब्बल तीन जणांना भोपळाही फोडता आला नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.