ब्रेकिंग न्यूज… | मुंबई कसोटीत न्यूझीलंडचा उडवला धुव्वा | भारताचा तब्बल 372 धावांनी विजय

0
252

मुंबई | ब्युरो | दि. ६ :

येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अंतिम कसोटीत भारतीय संघाने न्यूझीलंडचा अक्षरश: धुव्वा उडविला आहे. भारताच्या रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावातही 4 गडी बाद केले तर ऑफस्पिनर जयंत यादवनेही 4 गडी बाद केले. न्यूझीलंडचा स्पिनर एजाज पटेल हे पहिल्या डावात भारताचे सर्वच्या सर्व दहा गडी बाद केले होते. मात्र फलंदाजांनी त्याच्या कामगिरीवर पूर्णतः पाणी फिरविले. किवी संघाचा पहिला डाव 62 आणि दुसरा डाव केवळ 167 धावांत आटोपला व भारताला 372 धावांनी मोठा विजय प्राप्त झाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.