शुभमंगल सावधान | विकी – कतरिना अडकले लग्नबंधनात | फोटो झाले व्हायरल

0
138

जोधपुर | दि. 09

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. विकी कौशलने लग्नात फिकट गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती. सिक्स सेन्स फोर्टच्या मर्दाना महालासमोरील मोकळ्या बागेत विकी-कतरिनाच्या लग्नाचा शाही मंडप फुलांनी सजवण्यात आला होता. तर जोधपूरहून वधू-वरांसाठी खास पगड्या मागवण्यात आल्या होत्या.

विकी आणि कतरिना हनीमूनसाठी मालदीवला जाणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कतरिना आणि विकी 12 डिसेंबरपर्यंत सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये राहणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह शाही आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला.

 

लग्नात स्वादिस्ट जेवणाची व्यवस्था
कतरिना आणि विकीचा शाही विवाहसोहळा पार पडला. पाहुण्यांसाठी खास मिठाई आणि स्वादिष्ट जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.  सवाई माधोपूरच्या जोधपूर स्वीट होमने लग्नसोहळ्यात मिठाई पाठवली होती. लग्नासाठी जोधपूरची प्रसिद्ध डिश ‘मावा कचोरी’ आणि बिकानेरची ‘गोंड पाक’ मिठाई पाठवण्यात आली होती. याशिवाय नाश्त्यामध्ये गुजराती ढोकळा, समोसा आणि कचोरी देण्यात आली.

 

कतरिना आणि विकीच्या लग्नात ‘या’ अटींचा होता समावेश
कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या होत्या. लग्नाला येण्यासाठी पाहुण्यांना खास निमंत्रण कोड देण्यात आला होता. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली होती. तसेच पाहुण्यांना लग्नासंबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नव्हता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.