श्रेय घेण्याच काम भाजपनं करू नये : बाबु कुडतरकर

0
147

सावंतवाडी | दि १४ | 

शहरात होणाऱ्या ओपन जिम या आ. दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून होत आहे. या विकासकामासाठी शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे भाजपला श्रेय घ्यायच असेल तर त्यांनी आपल्या प्रभागात विकासकामं करून घ्यावं, दुसऱ्याच्या वॉर्डमध्ये जाऊन श्रेय घेऊ नये असा टोला शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक खेम राज उर्फ बाबू कुडतरकर यांनी लगावला. तर विकासकामांसाठी पाठपुरावा कुणी केला ? निधी कुणी दिला ? हे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना ठाऊक असल्याच टिकास्त्र त्यांनी केल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.