शिवसैनिकांची चिंता संजू परब यांनी करू नये ; रूपेश राऊळ यांचा पलटवार

0
553

सावंतवाडी | प्रतिनिधी |

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मंत्र दिला आहे. तोच शिरसावंद्य मानून शिवसैनिक काम करतात ते निवडणुकीसाठी उमेदवार मिळेल म्हणून स्वार्थापोटी काम करत नाही हे नगराध्यक्ष संजू परब यांनी लक्षात घ्यावे. तसेच शिवसैनिकांची काळजी घेण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थ आहेत अस मत शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सावंतवाडी शेती संस्था उमेदवार भाजपचे विद्याधर परब यांना शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर संजू परब यांनी केलेल्या टीकेवर रूपेश राऊळ यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा मंत्र दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक काम करत असतो. निवडणूका येतात आणि जातात. पण शिवसैनिक सदैव सामाजिक कार्य करत असतो. त्यामुळे निवडणुकीचा उमेदवार कोण? किंवा उमेदवारीसाठी काम करत नाही. शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्यानंतर तो विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतो. नगराध्यक्ष परब यांनी लक्षात घ्यावे. शिवसैनिक नाराज नाहीत. उलटपक्षी मजबुतीने काम करत असून जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये महा विकास आघाडीच्या पॅनेलला विजयी करण्यासाठी समर्थपणे प्रयत्नशील आहेत.नगराध्यक्ष परब हे काम करण्यास असमर्थ, कुचकामी ठरल्याने आमदार नितेश राणे यांना वारंवार सावंतवाडीकडे लक्ष घालावे लागत आहे. हे नगराध्यक्ष परब यांनी ध्यानात घ्यावे त्यामुळे कुचकामी ठरले असल्याचा शिक्कामोर्तब झाल्याने आमदार नितेश राणे लक्ष देत असल्याची चर्चा आहे.

शिवसैनिकांची काळजी घ्यायला शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री, खासदार व आमदार समर्थ आहेत. त्यामुळे शिवसैनिकांची चिंता नगराध्यक्ष परब यांनी करू नये. त्यांनी स्वतःची आणि सहकाऱ्यांची चिंता करावी. तसेच वारंवार दिशाभूल करणारे, खोटे पण रेटून ते बोलत आहेत. हे सुज्ञ सावंतवाडीकर जनतेला कळुन चुकले आहे असा टोला
रुपेश गुरुनाथ राऊळ यांनी लगावला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.