गणेशभक्तांच्या स्वागतासाठी कणकवलीनगरी सज्ज

0
450
कणकवली : गणेशोत्सवकाळात कणकवली शहरात होणारी वाहतूक कोंडी आणि पर्यायाने गणेशभक्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व्यापारी आणि पोलीस व एसटी प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सवपूर्व आणि गणेशोत्सव काळातील वाहतूक आणि वाहन पार्किंग तसेच गणेशभक्तांसाठी प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत निर्णय घेण्यात आले. कणकवली हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणारे शहर आहे. शहराच्या मधूनच राष्ट्रीय महामार्गही जातो. साहजिकच गणेशोत्सवकाळात    पटवर्धन चौक आणि बाजारपेठेत तसेच ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते. गणेशभक्तांना गणेश चतुर्थीकाळात गैरसोय होऊ नये यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव काळातील पार्किंग, वनवे याबाबत निर्णय घेण्यात आले.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.