सावंतवाडी :
अखिल भारतीय पोस्टल ग्रामीण डाक संघटना सिंधुदुर्ग अध्यक्षपदी संतोष हरीयाण तर सचिवपदी तुकाराम बाळकृष्ण गावडे यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय पोस्टल ग्रामीण डाक संघटना सिंधुदुर्गचे द्विवार्षिक अधिवेशन सिंधुदुर्गनगरी येथील रवळनाथ सभागृह मध्ये प्रमुख पाहुणे दत्ताराम सागवेकर रिजनल सचिव महाराष्ट्र प्रदेश व दत्ताजी टीपुगुडे ऑर्ग नायजायर सचिव कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी जिल्हयातील 400 ते 500 डाक सेवक उपस्थित होते. या पार पडलेल्या अधिवेशनात अध्यक्षपदी संतोष हरियाण तर सचिव पदी तुकाराम बाळकृष्ण गावडे यांची जिल्ह्यातील सर्व डाक वर्गांनी एकमताने निवड केली. या निवडीनंतर आपले मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष हरियाण यांनी सर्व डाक कामगारांचे आभार मानले. डाक वर्गाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचा शब्दही हरियाण यांनी दिलाय.