सावंतवाडी : दि. २१ : सावंतवाडी शहरांमध्ये जिओ केबलसाठी रस्त्याच्या बाजूला चर खोदण्याचे काम चालू असून, वैश्य वाड्याच्या लगत शिवाजी चौक गवळी तिठापर्यंत चर खोदून चार दिवस उलटले आहेत. याचा नाहक त्रास सामन्य नागरिकांना होत आहे. या चरामुळे अनेकांना दुखापत झाली आहे.
मात्र, या त्रासाबद्दल नगरपरिषदेच्या अभियंत्यांना माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी माहिती दिलीय. गेले चार दिवस यावर कोणतेही कार्यवाही झालेली नसून, आज दुपारपर्यंत उपाययोजना न केल्यास रस्ता बंद करण्यात येईल तसेच नगरपरिषदेचा निषेध करण्यात येईल असा इशारा भोगटे यांनी दिलाय.