‘त्या’ फुग्यात ‘हवा’ कोणाची ? | चर्चा फक्त दोडामार्गची

0
683

विनायक गावस

दोडामार्ग : कसई – दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत ‘हवा’ कोणाची ? याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. याठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि अपक्ष अशी लढत होत आहे. सर्वजण आपआपल नशिब आजमवत आहे. तर अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मंगळवारी सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून १३ जागांसाठी रिंगणात असलेल्या ३६ उमेदवारांना २१५१ मतदार मतदान करणार आहेत. दुपारपर्यंत जवळपास ५० टक्के मतदानाचा टक्का पार केला आहे. त्यामुळे चौकाचौकात, नाक्या नाक्यावर ‘हवा’ कोणाची याचीच चर्चा आहे. १५० ते २०० मतदार एका वॉर्डमध्ये असल्यानं उमेदवार ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी जिवाचं रान करत आहेत. मतदान कक्षाबाहेर उमेदवार थांड मांडून आहेत. मतदान करून उमेदवार बाहेर पडताच त्याची नोंदणी आपल्या डायरीत करत आहेत. याच धामधुमीत बाजारपेठेतील एका बुथवर २ फुगे लावण्यात आलेत. हवेत उडणरे हायड्रोजनचे हे फुगे सर्वांचंच लक्ष वेधत आहेत. ‘ऑरेंज’ आणि ‘येलो’ रंगाचे फुगे बुथवर का लावण्यात आले ? याचीच चर्चा गल्ली बोळात असून फुग्यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. तर निवडणूक निकालाच्या ‘फुग्यात’ हवा कोणाची ? यावरही तर्कवितर्क लढविले जात असून निवडणूकीच्या आखाड्यात ‘हवेतील फुग्यां’मुळे कसई- दोडामार्ग नगरपंचायत सध्या चर्चेत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.