सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. श्रेयस मांगलेकर यांनी दिला राजीनामा

0
504
सावंतवाडी : माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला धडक दिली. गैरहजर असणाऱ्या डॉक्टरांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा दिला. यानंतर अवघ्या चोवीस तासात ‘त्या’ पाच डॉक्टरांपैकी डॉ. श्रेयस मांगलेकर यांनी राजीनामा दिलाय. सावंतवाडी कुटीर रुग्णालयातील यम दरबाराचा ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ ने स्पॉट पंचनामा केल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी सावंतवाडी रुग्णालयावर धडक मारली. यावेळी राणे यांनी रुग्णसेवा योग्य मिळत नसल्याची विचारणा केली. डॉक्टरांची नेमणूक करूनही डॉक्टर हजर होत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांची पदे रिक्त दिसत नसल्याने नवीन डॉक्टरांची नेमणूक होत नाही, अशी कैफियत डॉ. पाटील यांनी मांडली. यामुळे जे डॉक्टर हजर होत नाही त्यांना प्रत्यक्ष भेटून जाब विचारा, असा आदेश निलेश राणे यांनी स्वाभिमान कार्यकर्त्याना दिला होता. जे डॉक्टर हजर होणार नसतील त्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली होती. अन्यथा पाच वर्षे गैरहजर असणाऱ्या डॉक्टरांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर क्रिमिनल ऑफेन्स दाखल करणार  असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर चोवीस तासाच्या आत सावंतवाडीतील डॉ. श्रेयस मांगलेकर यांनी शुक्रवारी आपला राजीनामा वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांच्या कार्यालयात सुपूर्त केला. आता इतर डॉक्टर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.