भाजपला धक्का | प्रवीण झाट्ये यांचा आमदारकीचा राजीनामा

0
757

पणजी :

गोव्यात निवडणुका जाहीर होताच मोठ्या उलथापालथीना सुरुवात झालीय. मयेचे आमदार प्रविण झाट्ये यांचा आमदारकीचा राजीनामा दिलाय. तसेच त्यांनी भाजपचाही राजीनामा दिलाय. मगो पक्षात प्रवेश करणार असल्याचही त्यांनी जाहीर केलंय.

भाजपन मये मतदारसंघांमध्ये नोकरीचा विषय सोडलेला नाही आणि सुप्रीम कोर्टाने तीन वर्षे अगोदर मायनिंग ऑपरेशन सुरू करायला सांगितलं होतं तरी देखील भाजप मायनिंग चा विषय सोडवू शकले नसल्याचं कारण देत त्यांनी भाजपाचा राजीनामा दिलेला आहे आणि पुढील दोन दिवसांनी मगो पक्षात प्रवेश करणार असल्याचही जाहिर केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.