देवगड न. पं. निवडणूक | चार जागांसाठी 12 जण रिंगणात

0
561

देवगड :

ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळे देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या एकूण चार प्रभागांच्या निवडणुका या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या. या चार प्रभागांचे निवडणुका या येत्या 18 जानेवारीला होत आहेत. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून चार प्रभागातून एकूण 13 अर्ज इच्छुक उमेदवारांनी दाखल केले आहेत. 10 जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. यात प्रभाग 8 मधून वैभव मिलींद केळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे आता देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या चार जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

  • यामध्ये प्रभाग ४ मनीषा अनिल घाडी (शिवसेना) मृणाली महेश मरसाळे (भाजप), प्रभाग ५ सुजाता उमेश कुलकर्णी (राष्ट्रीय काँग्रेस महाआघाडी) मनीषा अनिल जामसंडेकर (भाजप), प्रभाग ७ रोहन विश्वनाथ खेडेकर (शिवसेना) योगेश प्रकाश चांदोसकर (भाजप)
    प्रफुल भिकाजी कणेरकर (अपक्ष)
    सौरभ सुर्यकांत कुलकर्णी (अपक्ष)
    राजेंद्र बाळकृष्ण मेस्त्री (अपक्ष)

प्रभाग ८ संतोष रविंद्र तारी (शिवसेना) निधी नयन पारकर (भाजप) प्रणव चंद्रकांत नाडनकर (अपक्ष)आदीं उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  हे चित्र आता स्पष्ट झाले आहे .

उद्या पासून प्रचाराला वेग येणार असून प्रभाग 7 मधील माजी नगरसेवक योगेश चांदोस्कर व प्रभाग 8 शिवसेना तालुका प्रमुख संतोष तारी या दोन प्रभागातील लढतीकडे संपुर्ण देवगड वासीयांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.