मोठी बातमी | मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत

0
204

उत्तर प्रदेश : 

उत्तर प्रदेशसह इतर पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेपूर्वीपासूनच उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. अशातच उत्तर प्रदेशच्या राजकारणात अनेक चर्चांनी जोर धरला होता. यातील महत्त्वाची चर्चा म्हणजे, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा यांच्या उमेदवारीबाबत. आता यासंदर्भात माहिती समोर आली आहे. बसपाचे सरचिटणीस सतीश चंद्रा मिश्रा यांनी मोठी घोषणा केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या (BSP) अध्यक्षा मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच, ते स्वतःही विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

“माजी मुख्यमंत्री मायावती आणि मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. समाजवादी पक्षाकडे 400 उमेदवार नसतील तर ते 400 जागा कशा जिंकणार? समाजवादी पार्टी किंवा भाजपा सत्तेवर येणार नाही, बसपा उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणार आहे.”, असं बसपा खासदार सतीश चंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.