कणकवलीतील छ. शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराच्या कामाला सुरुवात | नवा वाद उफाळून येण्याची शक्यता | ‘हे’ आहे कारण

0
827

कणकवली :

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थलांतराबाबत आज प्रत्यक्षात कार्यवाहिला सुरवात झाली असून महामार्ग प्राधिकारणने 18 गुंठे जागेतील आर ओ डब्लू लाईन निश्चित केली आहे. त्यामुळे येथील स्थानिक स्टॉल धारकाचे व्यवसाय उघड्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली असून यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ त्याचप्रमाणे नगरपंचायत प्रशासन सकल मराठा समाज आणि स्थानिक शिवप्रेमींनी गर्दी करत घटनास्थळी ठाण मांडून होते. आज केवळ आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे झालेल्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराचा विषय गाजला होता. यावेळी पालकमंत्र्यांनी हा पुतळा पं. स. समितीच्या शेजारील शासकीय 18 गुंठा जागेत बसवण्याचे निर्देश देतानाच 13 जानेवारी रोजी आर्किटेक पाठविण्याचे सांगितले होते. त्यानुसार आज सकाळी आर्किटेक कामत हे कणकवलीत दाखल झाले. त्यांच्यासोबत डेप्युटी इंजिनिअर महेश कट्टी नायब तहसीलदार तानाजी रासम, मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आर्किटेक अमित कामत,मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील , महामार्ग प्राधिकरण महेश खाटीये, न.प.कर्मचारी किशोर धुमाळे, विभव करंदीकर, श्री.नेरकर तसेच छत्रपती शिवाजी चौक अध्यक्ष विद्याधर तायशेट्ये, आनंद पारकर, भाई परब, महेश सावंत, कल्याण पारकर, शेखर राणे, सुशांत दळवी, बच्चू प्रभुगावकर, सुशील सावंत, श्री. हिर्लेकर, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित करण्यासाठी सुरुवात करण्यात आली त्यानुसार महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लाईन निश्चिती केली उर्वरित जागा शासकीय जागेत मोडत असल्याचे सांगितले यानुसार सफेद रंगाच्या पावडरने हद्द निश्चित झाली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व स्थानिकांनी विविध प्रश्न उपस्थित केले त्यावेळी आज फक्त आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित होणार असल्याचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले.

आर्किटेक काम हे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी प्लॅन तयार करतील त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल असे सांगण्यात आले यावेळी पंचायत समिती च्या बाजूला असलेल्या अठरा गुंठा जागेतील सर्व बांधकामाची पाहणी करण्यात आली आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.