जिल्हा बँक नूतन उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा बांदा भाजपच्यावतीने सत्कार

0
490

सावंतवाडी : 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड आज पार पडली. यात अध्यक्षपदाची माळ मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली. आज नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची बांदा भाजपच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बांदा ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्ते तसेच भाजप पक्षाच्यावतीने अतुल काळसेकर यांना शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, ज्ञानेश्वर सावंत, भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.